Sunday, October 17, 2010

" दसरा " मेळावा 2010

नमस्कार मंडळी ,


प्रथम तुम्हा सर्वाना "दसर्या " निम्मित हार्दिक शुभेच्छा. आणि दसर्या मेळाव्याला उपस्थित राहिल्या बद्दल शतषः आभार .

तुमच्या सोबत हा दुसरा " दसरा " मेळावा करताना खुपच आनंद होत आहे .. आपल्या माणसं सोबत कुठला ही कार्यक्रम करायला आम्हाला आनंद वाटतो..... आणि तो आनंद जास्त लोका ना द्यायचा आमचा प्रयत्न असतो. या पुढे ही नावीन्यपूर्ण उपक्रम साजरे करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असेल.

आजच्या या कार्यक्रमाची दोन वैशिष्ठ आहेत..एक म्हणजे या वर्षी पासून आम्ही लहान मुलांसाठी एक आगळा वेगळा कार्यक्रम घेऊन येतोय "मजेची जत्रा" .

या कार्यक्रमाचा स्वरूप आम्ही दर वर्षी बदलण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेणे करून मुलांच्या सुप्त कला गूणाना एक हक्काचे व्यासपीठ मिळेल आपल्या हककच्या लोकांसमोर ! तुमच्या सूचना आणि आभप्र्या आम्हाला मोलाचा आहे ....आमच्या साठी दिशा दर्शक आहे !

या वर्षीचा आमचा दुसरा उपक्रम म्हणजे आपल्या " भंडारी" लोकांसाठी " भंडारी" लोका नी बनवलेली आपली हक्काची वेब साइट. जी आपल्या समोर सदर करताना आम्हाला खूपं आनंद होतोय !!! ही वेब साइट नवींण्या पूर्णा असण्यावर आमचा भर असेल ... काही गोष्टी या येणार्या काही दिवसात तुमच्या समोर येतील ...आणि आम्हला विश्वास आहे की ती तुम्हाला नक्कीच आवडेल.

वेब साइट विषयी काही सूचना / अभिप्राय असल्यास आम्हला जरूर कळवा. तुमच्या सूचना आणि अभिप्राय यातूनच एक नावीन्यपूर्णा आणि उत्कृष्ठ वेब साइट तयार होईल यात शंका नाही.

आमची आता पर्यंतची वाटचाल ही तुमच्या सहकार्या मुळेच शक्य आहे. तुमच्या सहकार्या बद्दल आम्ही भंडारी आपले सदैव ऋणी राहील ! असेच सहकार्या या पुढे ही आम्हाला मिळावे अशी हीच सदिच्छा .

"आम्ही भंडारी" कडून या पुढे आयोजित होणार्या कार्यक्रमाना उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी हीच एक नम्र विनंती !

"आम्ही भंडारी" ने भंडारी समाजासाठी केलेला हा एक प्रामाणिक प्रयत्न ! चुका बद्दल शमस्व !

"आम्ही भंडारी" ...संकल्प एकजुटीचा....अभिमानाचा आणि किर्तीचा !
 
जय भंडारी .

Monday, June 21, 2010

A reason to be happy...achievement of Vadhu Var Melava

Dear All,

It is a great pleasure to inform you all that Nilesh Satelkar has chosen Nayana Bilaye and Milind Khot has chosen Radhika Masurkar as their respective life partners...they found each other in our first Vadhu Var Melava ...

We were just a reason to get them for each other...and we would like to be a reason in future also, lets make our second Vadhu Var Melava with more excitement...

Its gives more pleasure for us since we make this event as a social responsibility rather than a business...

We wish Nilesh, Nayana , Milind & Radhika a very happy married life ahead....

Hope we all will make our second Vadhu Var Melava yet another sucessful story !

Thank you all for your support & blessings

Regards,

aamhi bhandari
Pune

Monday, March 15, 2010

Update on Hi-Tech Vadhu-Var Parichay Melava



Dear All,

This first ever Hindu-Bhandari ‘Hi-Tech Vadhu-Var Parichay Melava’ was a success story of aamhi Bhandari Group had taken this another innovative idea of ‘Hi-Tech Vadhu-Var Parichay Melava’ looking it as our social responsibility and not as a business. 

We would like to thank you for joining us and showing faith on us. It was a big challenge for us to reach to all of you within a very short time. But we had willingness for this ...so we could find out ways.

It was our first attempt of arranging ‘Hi-Tech Vadhu-Var melava’, we regret for if any inconvenience caused, during the event.

Your presence has now given us more strength to do more and more such social activities....because till now we were few Bhandari...now we have more Bhandari as we seek your co-operation, support and active part in our upcoming social as well as personal-help event. Let’s grow together!

We sincerely thank all of you.


Stay tuned for next updates...

Jai Bhandari.

Friday, February 26, 2010

रविवार, 14 मार्च 2010 - चलो पुणे

लग्न करायचे आहे का?
हो ना! मग वाट कसली बघताय? वधू-वर परिचय मेळाव्यासाठी आत्ता फक्त काहिच दिवस शिल्लक राहिले आहेत. त्वरा करा...आपली उपस्थिती आजच नोंदवा.


तुमचा भावी जोडीदार निवडण्यासाठी रविवार, 14 मार्च 2010 हा दिवस  राखून ठेवा.

Monday, February 15, 2010

Valentine Day 2010 Celebration - Blood Donation Drive


सामाजिक जबाबदारीचं भान ठेवून ’आम्ही भंडारी’ ग्रुपतर्फे यंदा १४ फेब्रुवारीला ’व्हॅलेंटाईन डे’ जरा हटके आणि वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. ’व्हॅलेंटाईन डे’ला ’आम्ही भंडारी’ ग्रुपच्या २० कार्यकर्त्यांनी ’जनकल्याण रक्तपेढी’, स्वारगेट, पुणे येथे स्वतः जाऊन रक्तदान केले. जनकल्याण रक्तपेढीचे संचालक डॉ. अतुल कुलकर्णी ह्यांनी ’व्हॅलेंटाईन डे’ वेगळ्या पद्धतीने साजरा केल्याबद्दल रक्तदात्यांचं कौतुक केलं आणि त्यांचा हुरुप वाढवला. ’आम्ही भंडारी’ ग्रुपतर्फे यापुढे दरवर्षी ’व्हॅलेंटाईन डे’ हा ’रक्तदान दिवस’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे.



सगळी क्षणचित्रे बघण्यासाठी येथे टिचकी मारा.

Tuesday, February 2, 2010

Blood Donation Drive Ad

रक्तदान शिबीर




२६ जानेवारी २०१०

२६ जानेवारी २०१०
 आदर्श भंडारी समाजोन्नती मंडळाचे वार्षिक स्नेहसंमेलन
स्थळ: उद्यान मंगल कार्यालय, सदाशिव पेठ, पुणे

कार्यक्रमाची क्षणचित्रे बघण्यासाठी येथे टिचकी मारा.

पहिला कार्यक्रम - दसरा मेळावा 2009


पुण्यातील हिंदू-भंडारी समाजातील लोकांना एकत्र आणण्यासाठी दसरा मेळावा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची क्षणचित्रे बघण्यासाठी येथे टिचकी मारा.


पुढील कार्यक्रमांची रुपरेषा

आपण समजोन्नतीसाठी  कुठले कुठले उपक्रम राबवू शकतो? या विषयी आमची सर्वांची चर्चा झाली. प्रत्येकाने आपले विचार मांडले. प्रत्येकाने त्याला समाज उन्नोतीसाठी काय-काय कार्यक्रम, उपक्रम करावेसे वाटतात हे सांगितले. सर्वमतानुसार आम्ही खालील उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे.


१. दसरा मेळावा:
ह्या ना त्या कारणास्तव परस्परांपासून दूर झालेल्या, विखुरलेल्या हिंदू-भंडारी समाजाला एकत्र आणण्य़ासाठी, आपली संस्कृती आणि आपले नाते-संबध जोपासणारा असा हा मेळावा.


सामाजिक बांधिलकी आणि कर्तव्य जपणारे हे शिबीर.









३. वधू-वर परिचय मेळावा:
सामाजिक जबाबदारी’ या भावनेतून साजरा होणारा आणि पारंपारिक पद्धतीने होणाऱ्या मेळाव्याला तंत्रज्ञाची जोड देत साजरा होणारा असा आगळा-वेगळा हिंदू-भंडारी समाजाचा  ’वधू-वर’ परिचय मेळावा.





४. करियर मार्गदर्शन (नॉलेज ट्रान्स्फर सेशन):
"जे जे आम्हां ठावे, ते ते दुसऱ्यास द्यावे" या भावनेतून यशस्वी जीवनाचा कानमंत्र देणारा असा हा उपक्रम






५. वृक्षारोपण:
जागतिक पातळीवरच्या या उपक्रमात खारीचा वाटा.





६. आरोग्यविषयक शिबीर:
निरोगी आरोग्याचे कानमंत्र देणारा हा उपक्रम.





७. वार्षिक सहली:
नेहमीच्या धकाधकीच्या-धावपळीच्या जीवनातून थोडासा वेळ बाजूला काढून थकल्या शरीराला आणि मनाला ताजेतवाने करण्यासाठी आपल्याच सामाजातील लोकांसोबत मौज-मस्ती.



या अशा अनेक उपक्रमाची रेलचेल आमच्या मनात नेहमी चालू असते. आणि असे हे उपक्रम सादर करण्यासाठी ’आम्ही भंडारी’ ग्रुप नेहमीच प्रयत्नशील असेल.

पहिली बार आमने-सामने


हिंदू भंडारी आहेत म्हणून फक्त इंटरनेटवरुन ओळखणाऱ्या आणि एकमेकांना प्रत्यक्षात कधी न भेटलेल्या ह्या व्यक्ती रविवारी, ६ सप्टेंबर २००९ ला सांयकाळी ५ वाजता पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिराच्या कॅफेटेरियात एकत्र आल्या.

सुरूवातीची ओळख-पाळख झाली. त्यात असं आढळून आलं कि बर्याचश्या व्यक्ती ह्या आजूबाजूच्या गावातल्याच आहेत. गावकडच्या व्यक्तींना भेटून होणारा आनंद काही वेगळाच असतो नाही का!

आमची सुरुवात


आमची सुरुवात भारतातील सुप्रसिद्ध सोशल नेटवर्किंग वेबसाईट ऑर्कुटवरुन झाली. आमच्या ऑर्कुट कम्युनिटीला भेट देण्यासाठी येथे टिचकी मारा.

कम्युनिटी सुरू केल्याबद्दल विकासचेही धन्यवाद आणि आभार. धन्यवाद ऑर्कुट.