Tuesday, January 31, 2012

Hindu-Bhandari Vadhu-Var Parichay MeLava


‘आम्ही भंडारी’ ग्रुपतर्फे हिंदू-भंडारी समाजातील विवाहेच्छुक उमेदवारांसाठी तिसरा ‘हाय-टेक’ वधू-वर परिचय मेळावा रविवार, दि. 11-मार्च-2012 रोजी, दु. 2 ते 6 या वेळेत उद्यान मंगल कार्यालय, सदाशिव पेठ, पुणे येथे आयोजित करण्यात आलेला आहे.

वधू-वर परिचय मेळाव्याची सविस्तर माहिती माहितीपत्रकात दिलेली आहे. माहितीपत्रक
प्रोफाईल फॉर्म आमच्या वेबसाईटवर मोफत आहेत. माहितीपत्रक व प्रोफाईल फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी येथे टिचकी मारा.

वधू-वर
परिचय मेळाव्यात सहभागी होण्यासाठी अगोदर नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. इच्छुक उमेदवारांनी त्यांची सगळी माहिती भरलेला प्रोफाईल फॉर्म; फोटो, जन्मपत्रिका आणि सहभाग फी (रु. 200/-) सह मंगळवार, दि. 6-मार्च-2012 पुर्वी माहितीपत्रकात नमूद केलेल्या कुठल्याही एका पत्त्यावर पाठवावा.

वधू-वर परिचय मेळाव्याविषयी अधिक माहिती हवी असल्यास आमच्या खालील प्रतिनिधींकडे संपर्क करावा.
प्रविण साळगांवकर - 9764153777, 9822153777; विकास मयेकर - 9922112173

धन्यवाद.

- 'आम्ही भंडारी' टीम

No comments:

Post a Comment