About Us


'आम्ही भंडारी' म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून एकत्र आलेल्या ’हिंदू भंडारी’ समाजातील युवक-युवतींचा एक ग्रुप आहे. ह्या ग्रुपमध्ये काही उच्चशिक्षित, उच्चपदस्थी नोकरी करणाऱ्या, व्यवसाय करणाऱ्या इंजिनिअर आणि डॉक्टरांसारख्या व्यक्ती आहेत. काही कॉलेजला जाणारे युवक-युवती आहेत.

’हिंदू भंडारी’ आहोत म्हणून फक्त इंटरनेटवरुन ओळखणाऱ्या, एकमेकांना कधी प्रत्यक्षात न भेटलेल्या आणि ह्या व्यक्ती ६ सप्टेंबर २००९ला पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिराच्या कॅफेटेरियात एकत्र आल्या. सुरुवातीला ७-८ जण एकत्र येवून सुरु केलेल्या ह्या ग्रुपची संख्या आज २५+ आहे. ह्या ग्रुपमध्ये दिवसें-दिवस वाढ होतेय.

ह्या ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी वयाचं बंधन नाही. स्त्री किंवा पुरुष असा भेदभाव नाही. शिक्षणाची अट नाही. फक्त एकच अट आहे. ती म्हणजे ’तुमची समाजासाठी मनापासूनची काम करण्याची इच्छा’.

एकत्र आलेल्या ह्या सगळ्यांचा एकच उद्देश-एकच ध्यास होता कि ’हिंदू-भंडारी’ समाजाचा विकास करणे. विखुरलेल्या ’हिंदू-भंडारी’ समाजाला एकत्र आणणे, नातेसंबंध जोपासणे, सुखःत तर सगळेच सामिल होतात पण मुख्यःत्वे करुन दुखःत सहभागी होणे, वेळ-प्रसंगी एकमेकांना मदत करणे, असे अनेक समाजप्रबोधनकारी उद्देश ह्या ग्रुपचे आहेत.